जळगाव- भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून २५ फूट खाली कोसळली. मात्र, सुदैवाने या अपघातात कार चालक बचावला आहे. जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपरी गावाजवळ आज बुधवारी दुपारच्या १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
देव तारी त्याला कोण मारी! जळगावात कार पुलावरून २५ फुट खाली कोसळूनही चालक बचावला - कार पुलावरून २५ फुट खाली कोसळूनही चालक बचावला
'देव तारी त्याला कोण मारी' अशी म्हण प्रचलित आहे. त्याचाच प्रत्यय आज जळगावात आला आहे. कार पुलावरून २५ फूट खाली कोसळली. मात्र, कारचालक बचावला आहे.
पारोळा ते जळगाव दरम्यान असलेल्या पिंपरी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एक पूल आहे. या पुलावरून एक कारचालक धुळ्याकडून जळगाव जिल्ह्यातील फैजपूरला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, रस्त्यात समोरील वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले अन् कार पुलावरून 25 फूट खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात तो बचावला. मात्र, या अपघातात कारचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून लहान-मोठे अपघात होत आहेत. यासंदर्भात वाहन चालकांकडून सातत्याने ओरड होत असली तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केले जात आहे.