जळगाव -जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या उत्साहात मतदारांनी मतदान केल्यानंतर उद्या निकाल जाहीर होणार आहे. निकालाबाबत सर्वच ग्रामपंचायतीत कमालीची उत्सुकता आहे. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून सकाळी दहापासून मतमोजणी सुरू होईल.
हेही वाचा -जळगावात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, नागरिकांचा रस्तारोको
जिल्ह्यात १५ जानेवारीला ७८३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ९२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे ६७८ ग्रामपंचायतींसाठी जिल्ह्यात ७८.११ टक्के मतदान झाले होते. सर्वत्रच अतिशय चुरशीच्या लढती झाल्या आहेत. २ हजार ४१५ मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यात ६७८ ग्रामपंचायतींसाठी एकूण १३ लाख ११ हजार ८४७ मतदार होते. त्यापैकी १० लाख २४ हजार ६८३ मतदारांनी मतदान केले. त्यात पुरुषांची संख्या ५ लाख ३८ हजार ५९५, तर महिलांची संख्या ही ४ लाख ८६ हजार ५४ इतकी होती. एकूण ७८.११ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जामनेर तालुक्यात ८२.४५ टक्के, तर सर्वात कमी मतदान भुसावळ तालुक्यात ६७.९६ टक्के झाले.
मतमोजणीचे प्रथम प्रात्यक्षिक