जळगाव- शेतातून केळी भरून बाजारपेठेत निघालेला ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात ट्रकमधील 10 मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ घडला. अपघातात ट्रकचेही नुकसान झाले आहे.
जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथून केळी भरून हा ट्रक गारखेडामार्गे जामनेरकडे येत होता. मुंदखेडा शिवारात शेतातून केळी भरलेला ट्रक (एम एच 19 बी एम 5051) गारखेडाकडे येत होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक गारखेडा गावाजवळ अचानक उलटला. त्यात किशोर नारायण चव्हाण (वय 21 वर्षे, रा. बोरगाव), हरीश सुपडू फेगडे (वय 38 वर्षे, रा. सावदा), प्रदीप अरविंद सोनवणे (वय 25 वर्षे, रा. फैजपूर), मुकेश संतोष गावंडे (वय 30,रा. इच्छापूर, मध्य प्रदेश), आकाश त्र्यंबक शेखर (वय 21 वर्षे), बापूनाथ मच्छिंद्र चव्हाण (वय 28 वर्षे), माणिक सखाराम शेखर (वय 41 वर्षे), परमेश्वर नारायण शिंदे (वय 19 वर्षे), रमेश मच्छिंद्र चव्हाण (वय 38), साजन प्रेमनाथचव्हाण (वय 25 वर्षे, सर्व रा. ओझर) हे जखमी झाले.