जळगाव - गेल्या दाेन दिवसांपासून राज्यात सर्वाधिक उष्ण शहर आणि जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची नाेंद आहे. जिल्ह्यात मंगळवारी ४४ अंश सेल्सिअस एवढे तापमान नाेंदवले गेले. त्यामुळे शहरात दिवसभर उकाडा जाणवत हाेता.
बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या समुद्रात हाेत असलेल्या वातावरणीय हालचालीमुळे तापमानावरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. जळगाव जिल्ह्यासह पवर्तीय प्रदेशालगत तापमान ४४ अंशावर असून एरवी मे महिन्यात सर्वात उष्ण असणारे नागपूर आणि चंद्रपुरात मात्र तापमान ४० अंशाच्या जवळपास तापमान आहे. जळगाव जिल्हा सलग दुसऱ्या दिवशीही पारा जास्त होता.