जळगाव - जिल्ह्याला हॉट सिटी म्हणून ओळख आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळगाव शहराच्या तापमानात कमालीची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
होळीनंतर हळुहळु तापमानात वाढ होत असते. मात्र, यंदा अवकाळी पाऊस झाल्याने तापमानात बदल झाला आहे. बुधवारी (दि. 16 मार्च) हा पारा 43 अंशाच्या पार गेल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे जिल्हा क्रीडा संकुल परिसरात शुकशुकाट पाहावयास मिळाला. रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी बाजारात टोप्या, रुपाल, स्कार्फ उपलब्ध झाले आहे.