जळगाव - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या कुटुंबीयांच्या खासगी वकिलांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. मात्र, सीबीआय ही स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. तिच्यावर माध्यमांकरवी दबाव आणणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याबाबत व्यक्त केले आहे. अॅड. उज्ज्वल निकम शनिवारी दुपारी जळगावात माध्यमांशी बोलत होते.
सुशांतसिंहच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांचा माध्यमांकरवी तपाससंस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न योग्य नाही. ते निष्णात वकील आहेत. सुशांतसिंहला न्याय देण्याची मागणी ते करत आहेत. त्यांची मागणी रास्त आहे. परंतु, अशा पत्रकार परिषदांमुळे तपासयंत्रणेवर दबाव येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अद्याप आरोपींना अटक का झाली नाही? असे सुशांतसिंहच्या कुटुंबीयांसह त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे. मात्र, हा तपासयंत्रणेवर दबाब आणण्याचा प्रयत्न आहे असे, अॅड. निकम म्हणाले.