जळगाव-येथील बीएचआरपतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या घोटाळ्यातील मुख्य संशयित असलेला सुनील झंवर (दि. 5) पुण्याच्या विषेश न्यायालयात शरण आला आहे. शरण आल्यानंतर झंवर याने फरार घोषित होण्याचे वॉरंट रद्द करुन घेतले. दरम्यान, याच घोटाळ्यातील दुसरा मुख्य संशयित तत्कालिन अवसायक (प्रशासक) जितेंद्र कंडारे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण ?
बीएचआर सोसायटीतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. 27 नोव्हेंबरला जळगावात छापेमारी करुन सहा जणांना अटक केली. मुख्य संशयित सुनील झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे दोघे तेव्हापासून पोलिसांना हुलकावणी देत होते. पुण्याच्या न्यायालयाने झंवर व कंडारे यांना फरार घोषित करण्यासाठी 12 फेब्रुवारीला घोषणापत्र जारी केले होते. या घोषणापत्रानुसार 30 दिवसांच्या आत दोघांना न्यायालय किंवा पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढण्यात आले होते. या वॉरंटची मुदत येणाऱ्या आठवड्यात संपुष्टात आल्यानंतर दोघांना फरार घोषित करण्यात येणार होते.
हेही वाचा -महिला दिन विशेष : पाच रुपयांत फुले विकणारी महिला झाली 'एसी फ्लॉवर शोरुम'ची मालकीण!