जळगाव -जळगावमध्ये 32 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरातील रामेश्वर कॉलनीत सोमवारी सकाळी ही घटना घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
जळगावमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या - jalgon crime news
जळगावमध्ये 32 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरातील रामेश्वर कॉलनीत सोमवारी सकाळी ही घटना घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

संतोष मोहन भालेराव असे मृत तरुणाचे नाव आहे. संतोष हा एमआयडीसीतील चटई कंपनीत काम करत होता. गेल्या १० ते १२ वर्षांपासून तो जळगावात स्थायिक झाला होता. दोन वर्षांपूर्वी पत्नी माहेरी निघून गेल्याने तो एकटाच राहत होता. त्याच्या आई वडिलांचे देखील निधन झाले आहे. त्यामुळे संतोष नैराश्यात होता. रविवारी रात्री त्याने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी घरमालक संतोष बोलेकर यांना हा प्रकार समजला. त्यांनी संतोषचे नातेवाईक धर्मराज बनसोडे यांना फोन करुन घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.