जळगाव- रावेर तालुक्याच्या पाल येथील सातपुडा विकास मंडळ, महाविद्यालयातील विद्यार्थिनीने कॉपीचा ठपका ठेवल्याच्या तणावातून गळफास घेत आत्महत्या केली आहे. अंकिता सुपडू बाविस्कर (वय 19), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, अंकिता ही घरातील मागच्या खोलीत आजीसोबत मंगळवारी (दि. 11 फेब्रुवारी) रात्री झोपी गेली होती. त्यानंतर तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच याबाबत रोवेर पोलिसांत घरच्यांनी तक्रार दिली. अंकिता ही विज्ञान शाखेतील पदवीचे शिक्षण घेत होती. 9 नोव्हेंबर, 2019 रोजी प्रथम वर्षातील प्रथम सत्राच्या मायक्रोबियल डिव्हरसिटी अल्गी विषयाच्या पेपरला कॉपी केल्याचा आरोप होता.