महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख लंपास - दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख लंपास

ललवाणी यांच्या दुचाकीची डिक्की तोडून डिक्कीत ठेवलेले १ लाख ६० हजार रुपये चोरून नेले. तसेच चोरून नेलेल्या पैशाच्या पिशवीत ललवाणी यांचे दोन बँकेचे एटीएम कार्ड, दुकानाच्या चाव्या यांचा देखील समावेश आहे.

जळगावात दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख लंपास
जळगावात दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख लंपास

By

Published : Feb 2, 2021, 5:02 AM IST

जळगाव - शहरातील एका व्यापाऱ्याच्या वाहनाच्या डिक्कीतून १ लाख ६० हजार रुपयांची रोकड अज्ञाताने लांबविल्याची घटना पंचमुखी हनुमान मंदीराजवळ घडली. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश विशनदास ललवाणी (वय-३५) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, कमलेश ललवाणी (रा. गणपती नगर) हे व्यापारी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जागृती हॉस्पिटलसमोरील शनीमंदीराजवळ आले होते. त्यावेळी शनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी दुचाकी पार्कीग करून ते मंदिरात गेले. मात्र, त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने ललवाणी यांच्या दुचाकीची डिक्की तोडून डिक्कीत ठेवलेले १ लाख ६० हजार रुपये चोरून नेले. तसेच चोरून नेलेल्या पैशाच्या पिशवीत ललवाणी यांचे दोन बँकेचे एटीएम कार्ड, दुकानाच्या चाव्या यांचा देखील समावेश आहे.

दर्शन घेवून ललवाणी दुचाकीजवळ आले असता, डिक्कीतून रोकड लंपास केली असल्याचे त्यांना दिसून आले. याप्रकरणी कमलेश ललवाणी यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

ABOUT THE AUTHOR

...view details