महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव शहर एलईडीच्या प्रकाशाने झळकणार; महापौरांच्या हस्ते एलईडी बसविण्यास सुरुवात - installation of LED lights in Jalgaon

गेल्यावर्षी शहरात एलईडी बसविण्यास सुरुवात करण्यात आली होती. तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेले काम पुन्हा सुरू झाले आहे.

Start of installation of LED lights in Jalgaon city
जळगाव शहर एलईडीच्या प्रकाशाने झळकणार; महापौरांच्या हस्ते एलईडी बसविण्यास सुरुवात

By

Published : Dec 15, 2020, 5:04 PM IST

जळगाव -शहरात सध्या असलेले पथदिवे काढून एलईडी बसविण्याच्या कामाला मंगळवारी पुन्हा सुरुवात झाली. मोहाडी रस्त्यावर महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते पूजा करून वाढवून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक, नागरीक आणि पदाधीकारी उपस्थीत होते.

गेल्यावर्षी शहरात एलईडी बसविण्यास सुरुवात करण्यात आली होती. शहराच्या काही भागात एलईडी बसविल्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे काम बंद झाले होते. मंगळवारी पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, सदाशिव ढेकळे, नगरसेवक कैलास सोनवणे, ज्योती चव्हाण, मनोज आहुजा, जितेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी, आशुतोष पाटील आदी उपस्थित होते.

जळगाव शहर एलईडीच्या प्रकाशाने झळकणार; महापौरांच्या हस्ते एलईडी बसविण्यास सुरुवात

मोहाडी रस्त्यापासून सुरुवात -

मोहाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून एलईडी लाईट बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महापौर भारती सोनवणे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी एलईडी आणि कामाची माहिती जाणून घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details