जळगाव - दिवसभर रुग्णसेवेत असणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी भित्तीचित्रांवर रंगकाम करत आपल्यातील कलेला वाट मोकळी केली. ही सुंदर चित्रे रुग्णालयात येणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधत आहे.
हेही वाचा -जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेखविरोधात भाजपचे आंदोलन
मन प्रसन्न करणारी चित्रे -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारामध्ये गेल्या दहा दिवसापासून भित्तीचित्र रंगवण्याचे आणि सुशोभित करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना प्रसन्न वाटावे, त्यांना उपचार घेताना प्रफुल्लित वाटावे या दृष्टीने ही चित्रे काढण्यात आली आहेत. महाविद्यालय व रुग्णालय आवारामध्ये फ्लॉवर्स व्हॅली, वारली संस्कृती, निसर्ग चित्र, तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांची मांडणी करण्यात आली आहे.