जळगाव -थकीत वेतन आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान, जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव आगारात वाहक म्हणून सेवारत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याला त्यांनी ठाकरे सरकारला जबाबदार धरले. ही घटना आज सकाळी समोर आली आहे. मनोज अनिल चौधरी (वय 30) असे आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी होते.
एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन-
दिवाळीसारखा महत्त्वाचा सण दोन दिवसांनी सुरू होत आहे. सणापूर्वी एसटी कामगारांना मागील तीन महिन्याचे थकीत वेतन, माहे ऑक्टोबरचे देय झालेले वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी, या मागण्यांसाठी आज राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे.
कोरोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कामगार काम करीत असूनही त्यांनी केलेल्या कामाचे वेतन त्यांना मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढलेला आहे. एकीकडे राज्यभर आंदोलन सुरू असताना जळगावात एसटी कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल-