जळगाव -राज्य परिवहन महामंडळात वाहक पदावर कार्यरत असलेल्या मनोज चौधरी यांनी आज (सोमवारी) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तीन महिन्यांपासून त्यांचे पगार झालेले नव्हते. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मनोज चौधरी यांनी टोकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपवली.
मनोज चौधरी यांनी दोन वर्षांपूर्वी कुसुंबा गावातील घरावर दुसरा मजला बांधण्यासाठी एका खासगी पतसंस्थेतून सात लाख रुपये कर्ज घेतले होते. यातील दोन लाख रुपये त्यांनी नियमित फेडले. तर आता पगार होत नसल्याने कर्जाचे हप्ते थकले होते. दुसरीकडे थकीत हप्त्यांवर मोठ्या प्रमाणात दंड देखील वाढत होता. अशात नियमित ड्युटीदेखील मिळत नव्हती. एकाच वेळी चहुबाजूंनी आलेले संकट आणि आर्थिक विवंचना यामुळे निराश झालेल्या मनोज यांची टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. कर्ज काढून बांधकाम केलेल्या घराच्या खोलीतच आत्महत्या करण्याची दुर्देवी वेळ त्यांच्यावर आली.
कोरोनामुळे बिघडले एसटीचे आर्थिक गणित -
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन पाळण्यात आला. यावेळी एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. नंतर टप्प्या-टप्प्याने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, एसटीचे बिघडलेले आर्थिक गणित अजून सुरळीत झालेले नाही. आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या एसटीला बंद काळात कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. यात सर्वात जास्त परिणाम कर्मचाऱ्यांना भोगावे लागत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेले नाहीत. त्याआधी देखील अनियमितता होती. यामुळे कर्मचारी हातउसनवारी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
हेही वाचा -एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; ठाकरे सरकारला धरले जबाबदार
चौधरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर -