जळगाव-शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या अध्यक्षतेखाली ही कारवाई करण्यात आली.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सट्टा; तीन जणांवर गु्न्हा दाखल - Jalgaon crime news
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील जावेद टायर पंचर दुकानाच्या मागे चार जण बेकायदेशीर सट्टा व जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकत ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तीन जणांवर गन्हा दाखल
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील जावेद टायर पंचर दुकानाच्या मागे चार जण बेकायदेशीर सट्टा व जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकत संशयित आरोपी पंढरीनाथ भोजू हटकर (वय-४८) रा. म्हसावद (ता.जि.जळगाव), राजू गजानन पाटील (वय-२४) रा. रामेश्वर कॉलनी, रामभाऊ निना पाटील (वय-५३) रा. रामेश्वर कॉलनी या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांची अंगझडती घेतली असता ६ हजार ४३० रूपये रोख आणि ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल असा एकुण ३७ हजार ४३० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.