जळगाव जिल्ह्याने गमावला अजून एक सुपुत्र; तांबोळे बुद्रुकच्या जवानाला वीरमरण - जळगावमधील जवान शहीद
सागर हे चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील रहिवासी होते. ते नोव्हेंबर 2017 मध्ये 5, मराठा इन्फन्ट्री बटालियनमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर ते सध्या मणिपूर याठिकाणी सेवारत होते. आज, 31 जानेवारी रोजी त्यांना वीरमरण आले.
जळगाव- जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील एका जवानाला आज (31 जानेवारी रोजी) मणिपूरमधील सेनापती येथे वीरमरण आले आहे. सागर रामा धनगर असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, सागर यांना वीरमरण कसे आले, काय घटना घडली? याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
3 वर्षांपूर्वी सैन्यात झाले होते रुजू-