महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कामचुकारपणा भोवला: जळगावच्या वेैद्यकीय महाविद्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - कामचुकारपणा भोवला जळगाव

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली.

Jalgaon medical College
डॉ. अविनाश ढाकणे

By

Published : Apr 7, 2020, 8:31 PM IST

जळगाव - देशात कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थतीत कोरोना या रोगाचे नियंत्रण, प्रतिबंधात्मक, आपत्कालीन उपाययोजना करण्यासंदर्भात नेमूण दिलेल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याप्रसंगी सहायक पोलीस अधिक्षक डॉ. नीलभ रोहण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.

डॉ. ढाकणे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा लागू करण्यात आला आहे. अशावेळी प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. जे कोणी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

त्याचबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने कोराना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांमध्ये जाऊन सर्व्हेक्षण करणाऱ्या आंगणवाडी सेविका, अशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर आरोग्य विभागाने तातडीने उपलब्ध करुन द्यावेत. याकरीता महिला बचतगटांनी तयार केलेले मास्क खरेदी करावे. तसेच निवारागृहातील नागरीकांना आवश्यक त्या सोयीसुविधा वेळेवर उपलब्ध होतील याची तपासणी संबंधित नोडल अधिकारी यांनी करावी. नागरीकांना जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही याकरीता जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी परिवहन विभागाने दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्यात.

ABOUT THE AUTHOR

...view details