महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुलाबराव पाटील समर्थकांची भाजप कार्यकर्त्याला मारहाण

रात्रीच्या वेळी प्रचार करत असल्याचा राग आल्याने गुलाबराव पाटलांच्या समर्थकांनी अत्तरदे यांचे समर्थक असलेल्या भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली असल्याचे, मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्यानी सांगितले आहे.

गुलाबराव पाटील समर्थकांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण

By

Published : Oct 19, 2019, 3:44 PM IST

जळगाव - शिवसेनेचे आमदार व राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराब पाटील, यांच्या समर्थकांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या दोन समर्थकांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

गुलाबराव पाटील समर्थकांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण

हेही वाचा... महाराष्ट्राच्या डोक्यावर शरद पवारांची 'छत्री', राष्ट्रवादीचे कार्टुन

राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेत युती असताना जळगाव ग्रामीण मतदारसंघात मात्र, बंडखोरीमुळे युतीत फूट पडली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली आहे. या बाबीचे तीव्र पडसाद शुक्रवारी मध्यरात्री जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात उमटले. रात्रीच्या वेळी प्रचार करत असल्याचा राग आल्याने गुलाबराव पाटलांच्या समर्थकांनी अत्तरदे यांचे समर्थक असलेल्या भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. पाळधी गावातील रेल्वे गेटजवळ हा प्रकार घडला. किशोर झंवर आणि नितीन पाटील अशी मारहाण झालेल्या दोन्ही भाजप कार्यकर्त्यांची नावे आहेत.

हेही वाचा... पाऊस.. प्रचार अन् पवार...

किशोर झंवर हा भाजपचा धरणगाव तालुका सरचिटणीस आहे. जळगाव येथून चारचाकीने घरी परतत असताना पाळधी गावातील रेल्वे गेटजवळ चारचाकी अडवून गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप किशोर झंवर आणि नितीन पाटील यांनी केला आहे. मारहाण केल्यानंतर गुलाबराव पाटलांच्या समर्थकांनी दोघांना पाळधी पोलीस ठाण्यात नेले. तेथे देखील पोलिसांसमक्ष मारहाण केल्याचे झंवर यांनी म्हटले आहे. पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला डांबून ठेवत आमची तक्रार दाखल करून घेतली नाही, असेही आरोप त्यांनी केले आहेत. या साऱ्या प्रकारामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बंडखोरीच्या मुद्यावरून भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. मतदानाला अवघे काही तास उरलेले असताना मतदारसंघात वातावरण चिघळले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details