महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 4, 2020, 8:35 AM IST

ETV Bharat / state

शिवसेनेने जपली सामाजिक बांधिलकी; ५ हजार कुटुंबांना शिदोरी वाटपाचा निर्धार

राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढविण्यात आला असल्याने अनेक कुटुंबांना पोटाची खळगी कशी भरावी? हा प्रश्‍न पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने गरजूंना मदतीचा हात दिला आहे.

jalgaon shivsena
jalgaon shivsena

जळगाव -कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असताना अनेक कुटुंबांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची दखल घेऊन शिवसेनेने गरजूंना मदतीचा हात दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत जळगाव जिल्हा शिवसेनेने सुमारे ५ हजार कुटुंबांना शिदोरी वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. रविवारी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला प्रारंभ झाला. या उपक्रमाला पाळधीच्या साई सेवा संस्थेचे सहकार्य लाभले आहे.

गुलाबराव पाटील पालकमंत्री

राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढविण्यात आला असल्याने अनेक कुटुंबांना पोटाची खळगी कशी भरावी? हा प्रश्‍न पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने गरजूंना मदतीचा हात दिला आहे. जिल्हाभरातील गरजू कुटुंबांना शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणारे किट वाटप करण्यात येत आहे. या किटमध्ये धान्यासह किराणा वस्तूंचा समावेश असून, साधारणपणे एका कुटुंबाची सुमारे १५ दिवसांपर्यंत गुजराण होईल, अशा प्रकारे यात वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि नंतर पूर्ण जिल्ह्यात ही मदत करण्यात येणार आहे.

लॉकडाऊन तिसर्‍यांदा वाढल्याने अनेकांच्या घरात खाण्यासाठी काहीही नसल्याचे दिसून येत आहे. याची दखल घेत वंचितांसाठी शिवसेनेतर्फे येत्या काही दिवसांमध्ये जिल्हाभरात या प्रकारची मदत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कुणाचीही उपासमार होऊ देणार नसल्याची ग्वाही देखील गुलाबराव पाटील यांनी दिली. या उपक्रमासाठी मदत करणारे साई देवस्थानचे प्रमुख सुनील झवर व त्यांच्या सहकार्‍यांचेही त्यांनी कौतुक केले.

ABOUT THE AUTHOR

...view details