जळगाव- जिल्हा शिवसेनेच्या वतीने गुरुवारी दुपारी भाजप नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. फडणवीस यांनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी टरबूज फोडून फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा निषेध नोंदवला. शहरातील टॉवर चौकात हे आंदोलन करण्यात आले.
फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे 'टरबूज फोडो' आंदोलन... - जळगाव शिवसेना आंदोलन
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना 'शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या भराव्यात' असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यांच्याविरोधात जळगावात निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा-राजर्षी शाहू महाराज भारतरत्न पेक्षा मोठे - संभाजीराजे छत्रपती
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना 'शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या भराव्यात' असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे राज्यभर संतप्त पडसाद उमटत आहेत. गुरुवारी दुपारी जळगाव जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते टॉवर चौकात एकत्र जमले होते. त्यांनी फडणवीस यांच्याविरोधात निदर्शने, जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करत एकप्रकारे महिलांचा अपमान केला आहे. बांगड्या महिलांचे आभूषण मानले जाते. त्यामुळे फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन होऊ शकत नाही. त्यांनी शिवसैनिकांसह महिलावर्गाची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.