जळगाव -नशिराबाद येथील शिवप्रेमी गणेश चव्हाण यांनी आपल्या तिन्ही घरांना गड किल्ल्यासारखे ( Fort house Ganesh Chavan Nashirabad ) स्वरूप दिले आहे. त्यांनी घरावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून शिवाजी महाराजांबद्दलचे अनोखे प्रेम व्यक्त केले आहे. या शिवप्रेमीची आणि किल्ल्यासारख्या असलेल्या अनोख्या घराची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.
Shivaji Maharaj Jayanti 2022 : जळगावातील शिवभक्ताचे अनोखे प्रेम, घराला दिले गड - किल्ल्याचे स्वरूप.. पाहा व्हिडिओ - किल्ला घर गणेश चव्हाण नशिराबाद
नशिराबाद येथील शिवप्रेमी गणेश चव्हाण यांनी आपल्या तिन्ही घरांना गड किल्ल्यासारखे ( Fort house Ganesh Chavan Nashirabad ) स्वरूप दिले आहे. त्यांनी घरावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून शिवाजी महाराजांबद्दलचे अनोखे प्रेम व्यक्त केले आहे. या शिवप्रेमीची आणि किल्ल्यासारख्या असलेल्या अनोख्या घराची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील जळगाव - नागपूर महामार्गालगत असलेल्या नशिराबाद गावात गणेश चव्हाण यांचे तिन्ही घरे सर्वांचेच आकर्षण ठरतात. या घरांना गणेश चव्हाण यांनी गड किल्ल्याचे स्वरूप देत शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान केला आहे.
सकाळी उठल्यावर दररोज नित्यनियमाने गणेश चव्हाण हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करतात. पूजा-अर्चा करून मुजरा करत आपल्या व्यवसायाची सुरुवात करतात. शिवाजी महाराजांबद्दल असलेले असे अनोखे प्रेम पाहून गणेश चव्हाण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर, यापुढेही मी माझ्या घरासमोर एक अनोख्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा गड किल्ला स्वरुपाचा एक बंगला तयार करणार असल्याचेही मत चव्हाण यांनी व्यक्त केले. गणेश चव्हाण यांनी उभारलेल्या घरांना पाहून खरच एक शिवभक्त दिसून आला असल्याचे मत नागरिक व्यक्त करतात.