जळगाव - जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे ( Jalgaon MLA Lata Sonwane corona infected ) यांना कोरोनाची लागण झाली आहे. 22 डिसेंबरला सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यापूर्वी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाची लागण झाली असल्याने आमदार लता सोनवणे या ( Lata Sonwane will absent in winter session ) हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्यावर घरीच उपचार करणार असल्याची आमदार लता सोनवणे यांचे पती चंद्रकांत सोनवणे यांनी दिली आहे.
हेही वाचा-Winter Session 2021 : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; मुख्यमंत्री उपस्थित राहणार
आरटी-पीसीआर चाचणीत ८ जणांची चाचणी पॉझिटिव्ह
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Session 2021 ) पार्श्वभूमीवर विधानभवनात ( Vidhan Bhavan ) प्रवेश देण्यासाठी घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत ८ जणांची चाचणी पॉझिटिव्ह ( 8 People Tested Positive for RT-PCR ) आली आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस आणि त्याचबरोबर आरटी-पीसीआर चाचणी विधान भवन प्रवेशासाठी ( Vidhan Bhavan Entrance ) बंधनकारक करण्यात आली आहे. अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. बुधवारी २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन ( corona tests for Winter Session 2021 ) प्रवेशासाठी खबरदारी म्हणून पत्रकार, अधिकारी आणि आमदारांची आरटी पीसीआर चाचणी ( Journalist Officer And MLA RT PCR Teste ) करण्यात आली. एकूण २६७८ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.
हेही वाचा-Winter Session 2021 : अधिवेशन प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाचणीत 8 जण कोरोना बाधित