महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी विधेयकाविरुध्द राष्ट्रवादीचा जळगावात शिंगाडा मोर्चा - शिंगाडा मोर्चा जळगाव बातमी

कृषी कायद्याविरोधात तसेच हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगावात जिल्हधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

shingada morcha by ncp in jalgaon
कृषी विधेयकाविरुध्द राष्ट्रवादीचा जळगावात शिंगाडा मोर्चा

By

Published : Oct 10, 2020, 8:41 PM IST

जळगाव - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्या विरोधात तसेच हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगावात जिल्हधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात आला.

शिंगाडा मोर्चादरम्यान माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया

यावेळी मोदी सरकार चले जाव, कृषि कायदा रद्द करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी प्रदीप कंद, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्षय गफ्फार मलिक, प्रमोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष राजू वानखेडे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष माझहर पठाण, सतीश फेगडे आदीसह मोठय़ा संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details