जळगाव -सरकार कोणाचेही असो मात्र, महिलांवरील अत्याचार शोभनीय नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अनेक महिलांना-तरूणींना जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'सरकार कोणाचेही असो महिलांवरील अत्याचार शोभनीय नाहीत'
सरकार कोणाचेही असो मात्र, महिलांवरील अत्याचार शोभनीय नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली आहे.
शरद पवार
पवार पुढे म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये सुधार होण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नाहीत. तसेच मंदी कमी करण्यासाठीदेखील त्यांनी काहीच केले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तर सीएए आणि एनआरसीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Last Updated : Feb 16, 2020, 10:03 AM IST