जळगावsharad pawar in jalgaon - खान्देशाचा इतिहास स्वाभिमानाचा इतिहास आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. धरणात पाणी कमी आहे. चुकीच्या हातात देशाचं राज्य गेलं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय. ते जळगावमध्ये जाहीर सभेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार म्हणाले, माझं भाग्य असं की, मला या जिल्ह्यात काम करायची संधी मिळाली होती. या राज्याचे चित्र बदलायला खान्देशची भूमिका महत्त्वाची आहे. जळगावची केळी प्रसिद्ध आहे. उत्तम शेतीचा आदर्श पाहायला मिळत आहे. धरणात पाणी कमी आहे. पिके आता गेली आहेत. ही स्थिती बदलायची आहे. वेळ लागेल, पण खात्रीनं बदलेल. चुकीच्या लोकांच्या हातात देशाचे राज्य गेले आहे. जळगाव ते नागपूर अशी दिंडी काढली होती. हळूहळू लोक वाढत गेले. त्यात काही लाख लोक जमले होते.
राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील आरोपांची पंतप्रधान मोदींनी चौकशी करावी- देशाचे पंतप्रधान मोदींनी भोपाळमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले आहेत. माझे आवाहन आहे, त्यांनी चौकशी करावी. चुकीचे असेल तर शिक्षा करा. जर चुकीचे नसेल तर तुम्ही काय शिक्षा घेणार तेदेखील देशाला सांगा. सत्तेचा गैरवापर करून शेतकरी, मजूर आणि आई-बहिणीवर लाठीहल्ला केला जात आहे. त्यात 100 टक्के बदल करायचा आहे. त्याला तुम्ही साथ द्यावी, ही विनंती, असं यावेळी राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी म्हटलयं.