जळगाव- हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरुद्ध खासगी फौजदारी खटला दाखल होता. त्या अनुषंगाने, प्राथमिक चौकशी करून कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासात कंगना रनौत पोलिसांना सहकार्य करत नसेल तर ती कायदेशीर कारवाईला पात्र ठरेल, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.
...तर कंगना रनौत कायदेशीर कारवाईला पात्र ठरेल - उज्ज्वल निकम - जळगाव उज्ज्वल निकम कंगना रनौत
उज्ज्वल निकम आज जळगावात होते. त्यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निकम यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याशी निगडित न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीत मत मांडले.
उज्ज्वल निकम आज जळगावात होते. त्यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निकम यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याशी निगडित न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीत मत मांडले. निकम पुढे म्हणाले की, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कंगना रनौतला दोन वेळा समन्स बजावले. तरी ती गैरहजर राहिली. त्यानंतर पोलिसांनी आता कंगनाला तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. कंगनाने या समन्सचे उल्लंघन केले तर पोलीस न्यायालयात जाऊन तिच्याविरुद्ध नॉन बेलेबल किंवा बेलेबल वॉरंट मागू शकतात. जेणेकरून पोलिसांना चौकशीसाठी पुढे मदत होऊ शकते. अर्थात पोलीस याकरता तिला त्वरित अटक देखील करू शकतात. मुंबई पोलीस ऍक्ट आणि सीआरपीसीतील तरतुदीनुसार कंगनाविरुद्ध मुंबई पोलीस कारवाई करू शकतात, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
पोलीस कोठडीचीही करू शकतात मागणी -
कंगना रनौत पोलिसांच्या समन्सला दाद देत नसेल किंवा पोलिसांना चौकशीकामी सहकार्य करत नसेल, तर तिच्याविरुद्ध पोलीस कोठडीची मागणी करू शकतात. जेणेकरून ज्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात करिता आवश्यक आहेत, त्यावर ती सहकार्य करत नसेल तर पोलिसांना कोठडी मागण्याचा पूर्णपणे कायदेशीर अधिकार आहे. यात न्यायालयाच्या अवमानाचा प्रश्न येत नाही. कारण न्यायालयाने पोलिसांना कंगना विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले आहेत. या कामी कंगना सहकार्य करत नसेल तर ती कायदेशीर कारवाईला पात्र ठरेल, असेही उज्वल निकम म्हणाले.