माझ्या मामाचं पत्र हरवलं! जळगावात पोस्ट कार्डचा तुटवडा - इंस्टाग्राम
पूर्वीच्या काळी पोस्ट कार्ड म्हणजे एकमेकांना संपर्क साधण्यासाठी असलेले हक्काचे माध्यम होते. सुख-दुःखाचे निरोप पोहचवणे असो किंवा एकमेकांना काही संदेश देणे असो, पोस्ट कार्डशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. काळाच्या ओघात पोस्ट कार्ड हरवले आहे. जळगावात पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट कार्डचं उपलब्ध नाहीत.
जळगावात पोस्ट कार्डचा तुटवडा
जळगाव -माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारंपारिक पत्रलेखन मागे पडले आहे. मात्र, बोटावर मोजण्याइतके जे काही लोकं अजूनही पोस्ट कार्डाचा वापर करतात; त्यांना सध्या पोस्ट कार्ड विकत मिळणेच मुश्किल झाले आहे. जळगावमधील मुख्य पोस्ट कार्यालयात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पोस्ट कार्ड मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.