जळगाव - जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचीच सरशी झाली आहे. तालुक्यातील ६८ पैकी तब्बल ४५ ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकवला आहे. त्यामुळे जामनेर तालुक्यात पुन्हा आमदार गिरीश महाजन यांचेच वर्चस्व असल्याचे सिध्द झाले आहे.
जळगावातील जामनेर तालुक्यात आमदार गिरीश महाजनांचीच सरशी निवडणूकीकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष -
माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात एकूण ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या, त्या पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर वडगाव ब्रुद्रूक ग्रामपंचायतीने निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. उर्वरीत ६८ ग्रामपंचायतीत निवडणूकीसाठी मतदान घेण्यात आले होते. जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवहणूकीत यशासाठी भाजप विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेने कंबर कसली होती. या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष होते.
भाजपचा तब्बल ४५ जागांवर विजय -
गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाची कसोटी होती. मात्र, त्यात गिरीश महाजन यशस्वी झाले आहेत. तालुक्यातल ६८ ग्रामपंचायतीपैकी भारतीय जनता पक्षाने तब्बल ४५ जागांवर विजय विजय मिळविला आहे. उर्वरीत जागावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, व शिवसेनेने विजय मिळविला आहे.