जळगाव - संत मुक्ताबाईंचा ७२३ वा तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा शुक्रवारी (४ जून रोजी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने छोटेखानी स्वरूपात साजरा झाला. यावर्षी पांडुरंग परमात्मासह अन्य संतांच्या पादुका या सोहळ्यात सामील झाल्या नाहीत. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त मुक्ताई मंदिरात आंब्यांची आकर्षक अशी आरास करण्यात आली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताबाईंचा तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा साध्या पद्धतीने साजरा
संत मुक्ताबाईंचा तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्य पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
भाविकांनी घरीच घेतले दर्शन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी श्रीसंत मुक्ताबाईंचा ७२३वा तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा साध्या पद्धतीने साजरा झाला. या सोहळ्याचे ऑनलाइन पद्धतीने थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे भाविकांना घरीच श्री संत मुक्ताबाईंच्या दर्शनाचा लाभ मिळाला.
वारीची, उपवासाची एकादशी ६ जून रोजी
परंपरेनुसार दरवर्षी वैशाख दशमीला मुक्ताबाई समाधी सोहळा साजरा होतो. यावर्षी पंचांगात दशमी तिथी ४ जून रोजी आहे. ५ जून रोजी अहोरात्र एकादशी वृद्धी तिथी व ६ जूनला सुद्धा एकादशी तिथी अशी दोन दिवस आलेली आहे. त्यामुळे वारीची, उपवासाची एकादशी ६ जूनला करायची आहे, असे संस्थानच्या वतीने कळवण्यात आले आहे.