महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षिकेशी अरेरावी केल्यावरून संस्था चालकाची विद्यार्थ्यांना स्टंपने मारहाण

शिक्षिकेशी अरेरावी केल्याच्या कारणावरून संस्था चालकानेच विद्यार्थ्यांना केली मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना अमळनेर तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील सद्गुरु पब्लिक स्कूलमध्ये घडली.

jalgaon
क्रिकेटच्या स्टंपने संस्था चालकानेच विद्यार्थ्यांना केली मारहाण

By

Published : Feb 29, 2020, 2:58 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील एका संस्था चालकाने ५ विद्यार्थ्यांना क्रिकेटच्या स्टंपने बेदम मारहाण केल्याची घटना उजेडात आली. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितल्यानंतर ५ दिवसांनी हा प्रकार समोर आला.

शिक्षिकेशी अरेरावी केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. अमळनेर तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील सद्गुरु पब्लिक स्कूलच्या संस्था चालकाने विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. संजय रमेशचंद्र व्यास असे संस्था चालकाचे नाव आहे. सद्गुरू पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेणारा कन्नड येथील जयदीप सोनवणे, जानवे येथील निखिल पाटील, चाळीसगाव येथील पवन राठोड, खेडी येथील प्रेमराज पाटील आणि राजवड येथील नयन पाटील या विद्यार्थ्यांना 24 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अभ्यास करत असताना संस्था चालक संजय व्यास यांनी क्रिकेटच्या स्टंपने बेदम मारहाण केली. या विद्यार्थ्यांनी एका शिक्षिकेसोबत अरेरावी केल्याचा आरोप आहे. त्या संबंधित शिक्षिकेने या प्रकारची तक्रार प्रिन्सिपल नीतू मुंजाल आणि संस्था चालक व्यास यांच्याकडे केली होती. त्यानंतर व्यास यांनी रागाच्या भरात विद्यार्थ्यांना मारहाण केली.

क्रिकेटच्या स्टंपने संस्था चालकानेच विद्यार्थ्यांना केली मारहाण

राजवड येथील नयन पाटील याला जबर मारहाण झाल्याचे समजताच त्याच्या पालकांनी शाळा गाठून शाळा प्रशासनाला याबाबत जाब विचारला. मात्र, प्रिन्सिपल मुंजाल यांनी विद्यार्थ्यांच्या मारहाणीचे समर्थन करत पालकांना परत पाठवले. त्यामुळे पालकांनी नयन यास घरी नेले.

गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार

या घटनेनंतर नयनच्या पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार गटशिक्षण अधिकारी राजेंद्र महाजन आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी शाळेत पोहोचले. त्यावेळी पालकांनी संस्था चालक व्यास आणि प्रिन्सिपल यांना याबाबत जाब विचारला. यावेळी पालकांनी घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्हीचे फुटेजही मागितले. मात्र, संस्था चालक व्यास यांनी दीड महिन्यांपासून कॅमेरे बंद असल्याचे सांगितले. या प्रकारची चौकशी करण्यात येणार असून, दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी गटशिक्षण अधिकारी महाजन यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details