जळगाव - यावल तालुक्यातील किनगावजवळ झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अभोडा, रावेर, केऱ्हाळा आणि विवरा येथील १५ पैकी १४ मृत व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत करण्यात आली. या मदतीचे धनादेश तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी सर्व नातेवाईकांच्या घरी जाऊन धनादेश प्रदान केले.
वारसांच्या डोळ्यात पाणी-
यावेळी शिवसेनेचे जिल्हा-उपप्रमुख प्रल्हाद महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, काँग्रेसचे युवा कार्यकर्ते धनंजय चौधरी, राजीव सवर्णे, शिवसेनेचे सुधाकर महाजन, युवक काँग्रेसचे संतोष पाटील, मंडलाधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मदतीचे धनादेश स्वीकारताना वारसांच्या डोळ्यात पाणी आले.
या वारसांना मिळाली मदत-
आभोडा येथे किनगाव अपघातात मयत झालेल्या मजूरांच्या वारसाला आज मुख्यमंत्री फंडातून मदत करण्यात आली. यामध्ये हुसेन शेरखा तडवी यांची पत्नी आणि मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता. यांना चार लाखाची मदत करण्यात आली आहे. तर समाधान वाघ (वय १०) यांचे आई-वडील आणि भाऊ यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याला सहा लाखाची मदत करण्यात आली. दिपिका मोरे (वय ९) हिचे आई, भाऊ आणि बहिनीचा अपघातात मृत्यू झाला होता. तीला सहा लाखाची मदत करण्यात आली आहे. संजना सपकाळे वय ४० यांचा पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली आहे.
आरीफा हुसेन (वय ३१) यांचा पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली आहे. अनिसा तडवी यांच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली आहे. वानम वाघ (वय ७५) यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली आहे. शांताबाई भालेराव (वय ५६) यांची मुलगा व सुन यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांना चार लाखाची मदत करण्यात आली आहे, असे एकूण १४ जणांच्या परिवाराला २८ लाखाची मदत करण्यात आली आहे.
जळगाव: किनगाव अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना २८ लाखाची मदत
यावल तालुक्यातील किनगावजवळ झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अभोडा, रावेर, केऱ्हाळा आणि विवरा येथील १५ पैकी १४ मृत व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत करण्यात आली.
किनगाव अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना २८ लाखाची मदत
अनाथ दिपिका.. खुशीच्या नावे फिक्स डिपॉझीट-
आभोडा येथील दिपिका आणि खुशीच्या जिवनात कायमची खूशी निघून गेली. अनाथ झालेल्या दोघी बहीनींच्या नावे सानुग्रह अनुदान त्या १८ वर्षाच्या होईपर्यंत पोस्टात फिक्स डिपॉझीट करण्यात आले. तहसिलदार यांनी हे काम केले.
हेही वाचा-धक्कादायक..! वडील आणि आजोबांचा हत्या करून तरुणाची आत्महत्या