जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा दिला. यावर एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आज प्रतिक्रिया दिली. 'ज्या पक्षासाठी नाथाभाऊंनी आपल्या आयुष्याची 40 वर्षे घालवली, त्या पक्षात न्याय मिळत नसल्याने शेवटी नाईलाजाने त्यांनी पक्ष सोडला. त्यांची मुलगी म्हणून मी सदैव त्यांच्या सोबतच असणार आहे. त्यांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे, असे अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. एकनाथ खडसे यांच्यासोबत उद्या मुंबईत मी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असेही यावेळी रोहिणी खडसेंनी स्पष्ट केले.
एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर अॅड. रोहिणी खडसे यांच्या प्रतिक्रियेबाबत उत्सुकता होती. रोहिणी खडसे यांनी गुरुवारी दुपारी खडसेंच्या राजीनाम्याबाबत आपले मत मांडले. एकनाथ खडसे यांनी राजीनामा का दिला आहे, हे त्यांनी कालच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आता ते राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत मी आणि आई मंदाकिनी खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत. नाथाभाऊंची मुलगी म्हणून मी सदैव त्यांच्या सोबत असणार आहे. भविष्यातही ते जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्यच असणार आहे, असे त्या म्हणाल्या.
आता नवा पक्ष, नवी जबाबदारी -