महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकनाथ खडसे नरमले; कन्या रोहिणी खडसेंनी भरला उमेदवारी अर्ज - एकनाथ खडसे

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपने शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या चौथ्या यादीत एकनाथ खडसेंऐवजी त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. रोहिणी यांनी दुपारी 2 वाजेनंतर समर्थकांच्या उपस्थितीत भाजपच्या ए. बी. फॉर्मसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

रोहिणी खडसेंनी उमेदवारी अर्ज भरला

By

Published : Oct 4, 2019, 6:07 PM IST

जळगाव -गेल्या चार दिवसांपासून भाजपमध्ये सुरू असलेला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर शुक्रवारी सुटला. या ठिकाणाहून खडसेंऐवजी त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली आहे. रोहिणी यांनी दुपारी 2 वाजेनंतर समर्थकांच्या उपस्थितीत भाजपच्या ए. बी. फॉर्मसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

रोहिणी खडसेंनी उमेदवारी अर्ज भरला

भाजपने शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या चौथ्या यादीत मुक्ताईनगर मतदारसंघासाठी एकनाथ खडसेंऐवजी त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. कन्येला उमेदवारी मिळाल्याने खडसेंनी एक पाऊल मागे घेऊन पक्षाचा आदेश मान्य केला. त्यानंतर आपल्या फार्म हाऊसवर उपस्थित समर्थकांसमोर आपली भूमिका मांडली. पक्षादेश मान्य असून आता भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसेंना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा. ज्या प्रमाणे मला सांभाळले तसेच कन्या रोहिणीला सांभाळून घेण्याचे भावनिक आवाहन यावेळी खडसेंनी केले. यानंतर खडसे कन्या रोहिणी यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गेले. रोहिणी खडसेंनी भाजपच्या ए. बी. फॉर्मसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, रोहिणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी खासदार रक्षा खडसे मात्र अनुपस्थित होत्या. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा -पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन

सेनेच्या चंद्रकांत पाटलांनी मांडली वेगळी चूल

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेत युती झाली आहे. परंतु, मुक्ताईनगर मतदारसंघात सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी वेगळी चूल मांडत खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंविरुद्ध अपक्ष अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, भाजपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी देखील आज आपला अर्ज दाखल केला. त्यामुळे रोहिणी खडसेंना चंद्रकांत पाटील तसेच रवींद्र पाटील यांचे प्रमुख आव्हान असणार आहे. आजची स्थिती पाहता याठिकाणी तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details