महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यावलमध्ये भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवत सराफ दुकानावर दरोडा

दुकानात वर्दळ नसल्याची खात्री केल्यानंतर दुकान मालक जगदीश कवडीवाले यांच्या दिशेने बंदूक रोखली. सोन्याचे दागिने काढून देण्याची मागणी करत दरोडेखोरांनी थेट कवडीवाले यांच्या कानावर बंदूक ठेवली. त्यानंतर दुकानातून सोन्याचे दागिने तसेच गल्ल्यातील काही रोकड घेऊन दरोडेखोर पळून गेले.

यावल सराफ दरोडा
यावल सराफ दरोडा

By

Published : Jul 7, 2021, 4:54 PM IST

Updated : Jul 7, 2021, 5:07 PM IST

जळगाव -जिल्ह्यातील यावल शहरात भरदिवसा दरोड्याची घटना घडली आहे. सराफ व्यावसायिकाच्या कानावर बंदूक ठेऊन चार दरोडेखोरांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. ही घटना आज (बुधवारी) दुपारच्या सुमारास, शहरातील सराफ बाजारात असलेल्या बाजीराव काशीनाथ कवडीवाले सराफ दुकानात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बंदुकीचा धाक दाखवत सराफ दुकानावर दरोडा

यावल शहरातील मुख्य बाजारपेठेत सराफ बाजारात जगदीश कवडीवाले यांच्या मालकीचे बाजीराव काशीनाथ कवडीवाले नावाचे सराफ दुकान आहे. आज दुपारच्या सुमारास दुकानात मोजके ग्राहक खरेदीसाठी आले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास तीन तरुण दुकानात आले. त्यांनी सोन्याचे दागिने घेण्याचा बहाणा केला. काही मिनिटात त्यांचा चौथा साथीदार त्याठिकाणी आला. त्याने दुकानात वर्दळ नसल्याची खात्री केल्यानंतर दुकान मालक जगदीश कवडीवाले यांच्या दिशेने बंदूक रोखली. सोन्याचे दागिने काढून देण्याची मागणी करत दरोडेखोरांनी थेट कवडीवाले यांच्या कानावर बंदूक ठेवली. त्यानंतर दुकानातून सोन्याचे दागिने तसेच गल्ल्यातील काही रोकड घेऊन दरोडेखोर पळून गेले.

हवेत केली फायरिंग?

अचानक झालेल्या या घटनेमुळे दुकान मालक जगदीश कवडीवाले तसेच कर्मचारी घाबरून गेले. दरोडेखोरांनी यावेळी हवेत फायरिंग केल्याचीही चर्चा आहे. परंतु त्याला दुजोरा मिळालेला नाही. काही प्रत्यक्षदर्शींनी दरोडेखोरांच्या हातून बंदूक खाली पडल्याचेही सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नाही.

तपासाला सुरूवात-

या घटनेत दरोडेखोरांनी नेमका किती रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे, याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी दुकानातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पोलिसांनी दुकान मालक जगदीश कवडीवाले यांचा प्राथमिक जबाब नोंदवला आहे.

दुचाकीने आले दरोडेखोर-

सोन्याचे दागिने लुटण्यासाठी आलेले दरोडेखोर हे दुचाकीने आलेले होते. दागिने लुटल्यानंतर ते दुचाकीने पळून गेले. दरोडेखोरांनी दागिने लुटण्यापूर्वी दुकानाची रेकी केली असावी, याशिवाय दरोडेखोर हे सराईत असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Last Updated : Jul 7, 2021, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details