जळगाव - शहरात गेल्या दोन वर्षांपासून अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. यामुळे शहरातील नवीन रस्त्यांच्या कामाला ‘ब्रेक’ लागला आहे. या योजनांच्या खोदकामामुळे शहरातील एकूण ६४५ किमी रस्त्यांपैकी ५७० किमीचे रस्ते खोदण्यात आले आहेत. म्हणजे शहरातील ९० टक्के रस्त्यांची दुर्दशा झाली असून, गेल्या दोन वर्षांपासून खड्डेमय रस्त्यावरूनच जळगावकरांना प्रवास करावा लागत आहे.
अमृत पाणी पुरवठा योजना शहरासाठी मंजूर झाल्यानंतर शहरात नवीन रस्त्यांचे काम हाती घेण्यास शासनाने बंदी घातली होती. त्यामुळे जळगावकरांना दोन वर्ष योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत खराब रस्त्यामधूनच मार्ग काढावा लागणार हे निश्चित झाले होते. मात्र, प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी हा शासन निर्णय एवढा मनावर घेतला की, रस्त्यांची साधी दुरुस्तीही त्यांना करता आलेली नाही. काही ठिकाणी दुरुस्ती झाली. मात्र, तीन महिन्यांच्या काळातच मनपाच्या कामाचे पितळ उघडे पडले. दरम्यान, आता कुठे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असली तरी हे काम थातुर-मातुर पध्दतीनेच होत आहे.
जळगाव शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते - jalgaon news
अमृत पाणी पुरवठा योजना शहरासाठी मंजूर झाल्यानंतर शहरात नवीन रस्त्यांचे काम हाती घेण्यास शासनाने बंदी घातली होती. त्यामुळे जळगावकरांना दोन वर्ष योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत खराब रस्त्यामधूनच मार्ग काढावा लागणार हे निश्चित झाले होते. मात्र...
जळगाव शहरात रस्त्यात खड्डे
-भुयारी गटार योजनेतंर्गत होणारे खोदकाम - १७० किमी
-पाणीपुरवठा योजनेतंर्गत झालेले खोदकाम - ६२४ किमी
-शहरातील रस्ते - ६४५ किमी
-दोन्ही योजनेतंर्गत तुटलेले रस्ते - ५७० किमी
-योजनेचे काम नसतानाही रस्त्यांची दुर्दशा - ९० किमी (अंदाजे)
हेही वाचा-'भारतात बनवलेली कोरोनावरील लस नव्या विषाणूवरही प्रभावी'