महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील भाजपच्या वाटेवर; उद्या वर्षा बंगल्यावर प्रवेश? - विधानसभा निवडणूक

सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. उद्या (३१ जुलै) ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत वर्षा बंगल्यावर आपल्या समर्थकांसह अधिकृत पक्ष प्रवेश करणार आहेत.

साहेबराव पाटील भाजपच्या वाटेवर

By

Published : Jul 30, 2019, 5:15 PM IST

जळगाव- सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. उद्या (३१ जुलै) ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत वर्षा बंगल्यावर आपल्या समर्थकांसह अधिकृत पक्ष प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे.

सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील भाजपच्या वाटेवर

साहेबराव पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी आहेत. सेवानिवृत्तीनंतर ते राजकारणात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमळनेर मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.

कोण आहेत साहेबराव पाटील?

साहेबराव पाटील हे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून ते २ महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी पोलीस खात्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून राज्यभर सेवा बजावली आहे. आता सेवानिवृत्तीनंतर ते राजकारणात येणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा होती. आता शर्मा यांच्यानंतर साहेबराव पाटील अशाच चर्चेत आले आहेत.

अमळनेर मतदारसंघातून आहेत इच्छुक -

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते अमळनेर मतदारसंघातून इच्छुक आहेत. अमळनेर विधानसभा मतदारसंघात यापूर्वी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, साहेबराव धोंडू पाटील, विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी बाहेरील जिल्हा आणि तालुक्यातून येऊन विजय मिळवल्याचा इतिहास आहे. हीच पार्श्वभूमी लक्षात घेता आता सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराब पाटील देखील उमेदवारीच्या प्रयत्नात आहेत. सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी, उत्तम जनसंपर्क, निष्कलंक व्यक्तिमत्त्व या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, असे असले तरी ते भाजपची उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details