महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दिल्यास केमिस्ट, ड्रगिस्टवर कारवाई

नागरिक औषधे आणण्याचा बहाणा करुन घराबाहेर पडताना दिसतात. मात्र यापुढे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री केली जाणार नाही. असे करणाऱ्या औषध दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.

Medicine without prescription
प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दिल्यास केमिस्ट, ड्रगिस्टवर कारवाई

By

Published : Apr 15, 2020, 5:04 PM IST

जळगाव - वारंवार सूचना देऊनही नागरिक लॉकडाऊनमध्ये औषधे, गोळ्या खरेदी करण्याचा बहाणा करून अनावश्यकरित्या रस्त्यांवर फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने, फार्मसी, केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) यांनी प्रामुख्याने औषधांची घरपचो सेवा देण्यावर भर द्यावा. त्याशिवाय औषधी दिल्यास कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.

डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दिल्यास केमिस्ट, ड्रगिस्टवर कारवाई

औषध विक्रेत्यांनी ग्राहकास औषध विक्री केल्यानंतर डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध दिल्याबाबत शिक्का मारावा. औषध दुकाने, फार्मसी, केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) यांनी या तरतुदींचे उल्लंघन केल्यास औषध निरीक्षक यांनी भारतीय दंड संहिता १८६० (४५)च्या कलम १८८नुसार कारवाई करावी, नागरिकांनी औषधी, गोळ्यांचा बहाणा करून रस्त्यावर फिरणे टाळावे, असे आदेशात म्हटले आहे.

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दिल्यास केमिस्ट, ड्रगिस्टवर कारवाई

तत्काळ परवाना निलंबित करणार

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. औषध निरीक्षक मनोज अय्या, असोसिएशन अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झंवर, कोषाध्यक्ष श्यामकांत वाणी, उपाध्यक्ष ब्रिजेश जैन, सहसचिव रूपेश चौधरी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व मेडिकल चालकांनी कार्यवाही करावी. मेडिकलवर डमी ग्राहक पाठवून प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी देणाऱ्यांचा परवाना निलंबित होईल. नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनचे सुनील भंगाळे यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details