जळगाव -महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर अर्थात 'मार्ड'तर्फे आज (शुक्रवार) राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 50 कनिष्ठ निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत. दरम्यान, या बंदमध्ये डॉक्टरांनी सहभाग नोंदवला असला तरी अतिदक्षता विभागासह इतर अत्यावश्यक रुग्णसेवा सुरळीतपणे सुरू आहे.
'या' मागण्यांसाठी बंद -
कोरोना काळात महाविद्यालय बंद असल्याने वैद्यकीय शिक्षण मिळालेले नाही, त्याचप्रमाणे कोरोना काळात पूर्ण वेळ सेवा दिल्याने राज्य सरकारने शैक्षणिक फी माफ करावी. यासह विविध मागण्यांसाठी डॉक्टरांच्या मार्ड या राज्यव्यापी संघटनेच्यावतीने हा बंद पुकारण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील वसतिगृहांमध्ये असलेली गैरसोय दूर करावी. त्याचप्रमाणे कनिष्ठ निवासी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या भत्त्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्यांसाठी मार्ड संघटना आग्रही आहे. बंद काळात अतिदक्षता विभागासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यामुळे जळगावात रुग्णसेवा फारशी प्रभावित झालेली नाही.
यांनी नोंदवला सहभाग -