महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात बंडखोरीमुळे बदलणार राजकीय समीकरणे - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

जळगावात विविध पक्षांच्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

जळगावात बदलणार राजकीय समीकरणे

By

Published : Oct 7, 2019, 11:44 PM IST

जळगाव -उमेदवारांच्या बंडखोरीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. यात चोपडा, मुक्ताईनगर, पाचोरा या मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे.


काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनाही बंडखोरांचा ताप सहन करावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मुक्ताईनगर मतदारसंघात अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजप-सेना युती असताना एकनाथ खडसेंच्या कन्या व भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसेंविरोधात सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली.

हेही वाचा - भुसावळ्यात सामूहिक हत्याकांडानंतर तणावपूर्ण शांतता; घटनास्थळी जमावबंदी लागू


राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. रवींद्र पाटील यांनी माघार घेत चंद्रकांत पाटलांना छुपा पाठींबा दिला आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंविरोधात चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. मागील निवडणूकीत एकनाथ खडसेंना जोरदार टक्कर देणारे चंद्रकांत पाटील यावेळी देखील रोहिणी खडसेंची वाट बिकट करतील, असा अंदाज आहे.

चोपडा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी-


चोपडा मतदारसंघात भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी दिसून आली. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जगदीश वळवींविरुद्ध अपक्ष उमेदवार माधुरी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्याचप्रमाणे सेनेच्या उमेदवार लता सोनवणे यांच्याविरोधात भाजपचे अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी केली.


पाचोऱ्यात किशोर पाटलांना शिंदेंचे आव्हान-


पाचोरा विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये बंडखोरी झाली आहे. शिवसेनेचे किशोर पाटील यांच्याविरोधात भाजपचे अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details