महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घोडे धुण्यासाठी नदीत उतरलेल्या सख्ख्या भावांचा मृत्यू; खोलीचा अंदाज न आल्याने बुडाले - young brothers flown away from jalgaon

घोडे धुण्यासाठी नदीच्या पात्रात उतरलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आसिफ खान मजीद खान (वय-16) आणि समीर खान मजीद खान (वय-12) अशी या मृत पावलेल्या भावांची नावे असून, ते रावेरमध्ये राहत होते.

घोडे धुण्यासाठी नदीच्या पात्रात उतरलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

By

Published : Nov 16, 2019, 5:40 PM IST

Updated : Nov 16, 2019, 8:02 PM IST

जळगाव - घोडे धुण्यासाठी नदीच्या पात्रात उतरलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (दि16नोव्हें) दुपारी दीडच्या सुमारास रावेर तालुक्यातील पुनखेडा गावाजवळ भोकर नदीपात्रात हे तरूण बुडाले. मृत्यू पावलेले दोघेही भावंड रावेरचे रहिवासी आहेत.

घोडे धुण्यासाठी नदीच्या पात्रात उतरलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

आसिफ खान मजीद खान (वय-16) आणि समीर खान मजीद खान (वय-12) अशी या मृत पावलेल्या भावांची नावे असून, ते रावेरमध्ये राहत होते. दोघेही शहरातील घोडे व्यावसायिक मजीद खान यांची मुले होती. आसिफ आणि समीर हे दोघेही दुपारी भोकर नदीत घोडे धुण्यासाठी गेले होते. पात्रात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले; व त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित घटनेची माहिती मिळताच पुनखेडा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर काही पोहणाऱ्यांनी दोघांचा शोध घ्यायला सुरुवात केली. खूप वेळ शोधाशोध केल्यानंतर दोघांचे मृतदेह हाती लागले. या घटनेमुळे रावेर शहरावर शोककळा पसरली आहे.

Last Updated : Nov 16, 2019, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details