महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातपुड्याच्या जंगलात दुर्मीळ 'ब्लू मॉरमॉन' फुलपाखराची नोंद - जळगाव 'ब्लू मॉरमॉन' फुलपाखरू न्यूज

फुलपाखरू हा अतिशय सुंदर आणि नाजूक जीव आहे. हवामान बदल आणि इतर मानवनिर्मित कारणांमुळे या जीवांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने जळगावमध्ये फुलपाखरांची गणना करण्यात आली.

Butterflies
फुलपाखरू

By

Published : Oct 4, 2020, 1:33 PM IST

जळगाव - वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे 'बिग बटरफ्लाय मंथ'च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या फुलपाखरू गणनेत १०७ प्रकारच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली. सातपुड्यातील मनुदेवी परिसरात महाराष्ट्रातील सर्वात दुर्मीळ 'ब्लू मॉरमॉन' फुलपाखराची नोंद करण्यात झाली.

वन्यजीव संरक्षण संस्थेचे अभ्यासक प्रसाद सोनवणे यांनी ही महत्त्वपूर्ण पूर्ण नोंद घेतली. या फुलपाखरांच्या नोंदीबद्दल लवकरच शोधनिबंध प्रसिद्ध होणार आहे. या फुलपाखरू गणनेत निळाप्लेन टायगर, स्मॉल ग्रास ज्वेल यासारख्या १ ते १.५ सेंमी आकाराच्या भारतातील सर्वात लहान फुलपाखरांपासून ते माणसाचा तळहात सहज व्यापेल एवढ्या मोठ्या ब्लू मॉरमॉन फुलपाखरांच्या प्रजाती आढळल्या.

ब्लू मॉरमॉन फुलपाखरू

आढळलेली फुलपाखरे -

प्लेन टायगर, कॉमन वाँडरर, लाईम, ब्लू बॉटल, कॉमन मॉरमॉन, लेसर ग्रास ब्लू, ग्राम ब्लू, इमिग्रंट, कॉमन ग्रास यल्लो, कॉमन रोज, कॉमन गल, येल्लो-ऑरेंज टीप, कॉमन सेलर, ब्राऊन आऊल, दाट झाडीत बसणारे, तपकिरी रंगछटा असलेले बुश हॉपर आणि स्विफ्ट सारखी वेगाने फुलपाखरे या गणनेत आढळले आहेत.

फुलपाखरू उद्यान विकसित करण्याचा मानस -

बटरफ्लाय मंथच्या पार्श्वभूमीवर जळगाव, नंदुरबार आणि नाशिकमध्ये कार्यरत असलेली वन्यजीव संरक्षण संस्था फुलपाखरू निरीक्षण सहली, फुलपाखरू छायाचित्रण, फुलपाखरांचे अंडी घालण्यासाठी झाडांची लागवड अशा माध्यमातून फुलपाखरांच्या प्रजातींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्य करत आहे. वनविभागाच्या परवानगीने मागील वर्षी एरंडोल वनक्षेत्रातील हनुमान खोरे येथे वृक्षसंवर्धन समितीच्या सहकार्याने ३० लाख लिटर पाणी साठून राहील, असे बंधारे बांधण्यात आले. तिथे आता फुलपाखरांच्या वाढीसाठी फुलपाखरू उद्यान विकसित करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे यांनी सांगितले.

फुलपाखरू सर्वेक्षणात रवींद्र फालक, राहुल सोनवणे, बाळकृष्ण देवरे, प्रसाद सोनवणे, अमन गुजर, योगेश गालफाडे, रवींद्र सोनवणे, चेतन भावसार, अभिषेक ठाकूर, गौरव शिंदे, जगदीश बैरागी, सुरेंद्र नारखेडे, सतीश कांबळे यांनी सहभाग नोंदवला.

ABOUT THE AUTHOR

...view details