जळगाव -बेपत्ता झालेल्या पतीला शोधण्याच्या बहाण्याने व लग्नाचे अमिष दाखवित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना जळगाव येथे घडली आहे. त्यानंतर महिला गर्भवती राहिल्याने त्या व्यक्तीने महिलेचा गर्भपात करुन तीला सोडून दिले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील २३ वर्षीय महिलेचा पती बेपत्ता झाल्याने ती एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी गेली होती. पोलीस ठाण्याबाहेर त्या महिलेची रविंद्र भगवान भडक याच्यासोबत ओळख झाली. मी तुमच्या पतीला शोधण्यास मदत करेल, असे सांगत त्याने महिलसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेला सुरुवातीला सोयगाव येथे नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वेळोवेळी तिला लग्नाचे अमिष दाखवून शिर्डी, अजिंठा, फर्दापूर येथे घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच घर मालकाचे भाडे थकीत झाल्याने रविंद्र भडक याने त्या महिलेला त्याच्या ओळखीने खोली घेवून दिली होती.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार - जळगाव महिला अत्याचार बातमी
लग्नाचे अमिष दाखवित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना जळगाव येथे घडली आहे.
पतीचा नांदविण्यास नकार
महिलेच्या पतीचा शोध लागला; परंतु त्याला या सर्व प्रकारची माहिती झाल्याने त्याने त्या विवाहितेला नांदविण्यास नकार देत पुन्हा तिला सोडून दिले. यावेळी रविंद्रने त्या विवाहीतेला लग्नाचे वचन देत तिला संसारपयोगी वस्तूंची खरेदी करुन दिली होती. वारंवार अत्याचार झाल्यानंतर ती विवाहिता गर्भवती झाली; परंतु रविंद्र भडक याने गर्भपाताच्या गोळ्या आणून देत एका खासगी डॉक्टराकडून त्या विवाहीतेचा गर्भपात केल्याप्रकरणी त्या महिलेने शुक्रवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी विवाहीतेच्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.