महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परिचारकाने लग्नाचे अमिष दाखवून डॉक्टर मुलीवर केला वारंवार बलात्कार

जळगाव-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारक म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाने बीड जिल्ह्यातील डॉक्टर तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष देऊन परिचारकाने हा प्रकार केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून जळगावातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशन
एमआयडीसी पोलीस स्टेशन

By

Published : Sep 30, 2021, 12:07 PM IST

Updated : Sep 30, 2021, 1:01 PM IST

जळगाव -येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारक म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाने बीड जिल्ह्यातील डॉक्टर तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष देऊन परिचारकाने हा प्रकार केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून जळगावातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संपत लक्ष्मण मल्हाड (मुळ रा. दरिबडची, ता. जत, जि. सांगली) असे संशयित आरोपी असलेल्या परिचारकाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर परिचारक संपत बेपत्ता झाला आहे.

लग्नानंतरही केले अत्याचार-

परिचारकाने डॉक्टर तरुणीवर लग्नाचे आमिष देऊन ५ वर्षे अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, या परिचारकाचे लग्न झाल्यानंतरही तिचे शोषण सुरूच ठेवले होते. तरुणीने विरोध केल्यानंतरही तिच्यावर अत्याचार होतच राहिले. जळगावात आणून हातपाय बांधून अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

प्रशिक्षणासाठी सांगलीला गेल्यावर झाली होती एकमेकांशी ओळख-

पीडित तरुणी उस्मानाबाद येथे नर्सिंग कॉलेजला नोकरीस असताना प्रशिक्षणासाठी सांगली येथे गेली होती. या दरम्यान तिची संपतशी ओळख झाली होती. त्यावेळी संपतने तिला लग्नाचे आमिष देवून तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संपतने अनेकवेळा तिच्याकडून पैसे देखील घेतले. अत्याचारातून तरुणी गर्भवती झाल्याने त्याने तिला जळगावात बोलावून पाळधी येथील एका रुग्णालयात गर्भपात केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

हातपाय बांधून केला अत्याचार-

मागील वर्षी मार्चमध्ये संपतने लग्न केले. त्यानंतर पीडितेने त्याच्यासोबत संबंध तोडले. पण लग्न झाल्यानंतर देखील संपतने तिच्या गावी जाऊन प्रेमसंबंधाबाबत लोकांना सांगण्याची धमकी दिली. भेटण्यासाठी संपत तिच्याकडे तगादा लावत होता. सप्टेंबर २०२० मध्ये औरंगाबाद येथे बोलावून घेत तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. ६ सप्टेंबर २०२१ रोजी संपतने तरुणीस जळगावात बोलावले. पांडे डेअरी चौकातील मैत्रिणीच्या खोलीवर घेऊन गेला. तेथे त्याने थेट हात-पाय बांधून तिच्यावर अत्याचार केले. यानंतर तरुणीस बीड येथे मूळगावी सोडून आला. अखेर तरुणीने जळगावात एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार संपतच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Sep 30, 2021, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details