जळगाव - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे हवामान बदलाचा प्रत्यय येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या.
हेही वाचा -जळगावात कोव्हॅक्सिन लसीचे २३०० डोस उपलब्ध; दुसऱ्या डोससाठीच लसीकरण होणार
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. काल, शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर आज देखील सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी सूर्यदर्शन झाले. जळगाव शहरात दुपारी सूर्यदर्शन होऊन पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. अडीच वाजताच्या सुमारास वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. 15 ते 20 मिनिटे पाऊस पडला.
जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी