महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray: ठाकरेंचा गौप्यस्फोट! म्हणाले, खडसेंना पुढे करुन भाजपने युती तोडली - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

हे सगळ चित्र पाहिल्यानंतर पाकिस्तानसुद्धा सांगेल की शिवसेना कुणाची आहे. परंतु, मोतीबिंदू झालेल्या निवडणुक आयोगाला मात्र ते दिसत नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगावर टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (23 एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा झाली. त्यामध्ये ते बोलत होते. तसेच, एकनाथ खडसेंनी मला 2014 ला युती राहणार नाही. ती तुटली असे सांगितले होते. त्यांना पुढे करून हे कारस्थान भाजपने केले असा गौप्यस्फोटही उद्धव ठाकरे यांनी या सभेत केला आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

By

Published : Apr 23, 2023, 8:14 PM IST

Updated : Apr 23, 2023, 10:54 PM IST

पाचोरा येथे सभेत बोलताना उद्धव ठाकरे

जळगाव (पाचोरा) : सभेत घुसू म्हणणाऱ्यांना सांगतो अशा घुसा खूप पाहिल्या आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजची पाचोऱ्यातली ही तिसरी मोठी सभा झाली. त्यामध्ये ते बोलत होते. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. सभेसाठी तयारी करायची या उद्देशाने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कालच सभास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारीही उपस्थित होते.

शेतकऱ्याला पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत : सध्या हे उलट्या पायाचे सरकार आहे. तसेच, अवकाळी पाऊसच नाही तर हे अवकाळी सरकार आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. या सरकारने अवकाळी पाऊस झाल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी मदत केली असा प्रश्न उपस्थित करत कुठेतरी यांनी मदत केलीका हे दाखवा असही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. तसेच, हे बाप बदलतात आणि बाप चोरतातही असे म्हणत शिवसेनेच्या आमदारांवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी कोणत्या शेतकऱ्याला पिकविम्याचे पैसे मिळाले असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

माझे कुणीच केस वाकडे करू शकत नाही : पाठीवरती सोडा पण आईच्या कुशीवर वार करणारी औलाद आपली असूच शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांवर जहरी टीका केली. तसेच, ढेकण मारण्यासाठी तोफेची गरज नाही. एका बोटाने ही मरतील असही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर मला आश्यर्य वाटत की माझ्याकडे काहीच नाही. नाव चोरले, चिन्ह चोरले परंतु, तुम्ही माझ्याबरोबर आहात हे मोठे बळ आहे. त्यामुळे माझे कुणीच केस वाकडे करू शकत नाही असही ते म्हणाले आहेत.

भाजपला देशामध्ये इतर पक्ष नको आहेत : जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक सत्य बोलले म्हणून त्यांना टार्गेट करणे सुरू झाले आहे. त्यावर देशाचे गृहमंत्री म्हणतात ते राज्यपाल होते तेव्हा का बोलले नाहीत. आता त्यांना विचारतो तुम्ही विरोधकांवर धाडी टाकता आणि तुमच्यात ते सामिल झाल्यावर ते शुद्ध होतात आणि आमच्यामध्ये असताना भ्रष्ट कसे असतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. याचा अर्थ इतकाच की भाजपला देशामध्ये इतर पक्ष नको आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

भाजपला स्वपक्षातील लोकही नकोत : आजच्या सभेला एकनाथ खडसे येणार होते. ते व्यासपीठावर असते तर बर झाल असत. कारण 2014 ला भाजपने एकनाथ खडसेंना पुढे करून मला आपली युती तुटली असे सांगायला लावले. खडसे यांना पुढे करण्याचे कारण म्हणजे भाजपला स्वपक्षातील लोकही नको आहेत असही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर जे आपल्याबरोबर आहेत त्यांच्या पाठीमागे ईडी, सीबीआय लावतात असा आरोपही त्यांनी केला आहे.

आमचे हिंदूत्व शेंडीचे नाही : तुम्हाला मी कुटुंब प्रमुख वाटतो की मिंधे तुमचा वाटतो असा प्रश्न उपस्थित करत हा गद्दार चोर तुम्हाला आपला वाटतो का असही ते म्हणाले आहेत. त्याचवेळी जर निवडणुक झाली तर पाचोऱ्यात गद्दारांना गाडल्याशिवाय तुम्ही राहणार की नाही असा प्रश्नही उपस्थितांना केला आहे. याचवेळी आमचे हिंदूत्व शेंडीचे नाही तर आमचे राष्ट्रीयत्व तेच आमचे हिंदूत्व आहे. भाजपने त्यांचे हिंदूत्व कोणते आहे हे जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी यावेळी केले आहे.

हेही वाचा :अयोध्येतील श्री राम मंदिराच्या नव्याने बांधलेल्या संकुलाचा जलाभिषेक; १५५ देशांमधून आणले होते पवित्र पाणी

Last Updated : Apr 23, 2023, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details