महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जळगावात 'जनआक्रोश'

सकाळी ११ वाजता शिवतीर्थ मैदानापासून 'जन आक्रोश' मोर्चाला सुरुवात झाली. आदिवासी विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या देवेंद्र भोई या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जळगावात मोर्चा

By

Published : Aug 19, 2019, 10:15 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वैजापूर गावात एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जन आक्रोश' मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खान्देशातील विविध भागातील आदिवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

निषेध करताना आदिवासी विद्यार्थी

सकाळी ११ वाजता शिवतीर्थ मैदानापासून 'जन आक्रोश' मोर्चाला सुरुवात झाली. आदिवासी विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेतले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या देवेंद्र भोई या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. शिवतीर्थ मैदानापासून निघालेला हा मोर्चा नवीन बस स्थानकाकडून स्वातंत्र्य चौकामार्गे दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी देखील आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी अत्याचार पीडित मुलींची आई देखील उपस्थित होती. दरम्यान, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सदरील घटनेप्रकरणी विद्यार्थ्यांशी चर्चा करुन शासनापर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details