महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव कारागृह परिसरातून कैद्याचा पलायनाचा प्रयत्न; झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी

न्यायालयात हजेरी लावल्यानंतर कारागृहात परतताना एका कैद्याने पोलिसाच्या हाताला झटका देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली.

By

Published : Nov 22, 2019, 10:39 AM IST

Updated : Nov 22, 2019, 11:10 AM IST

कैद्याचा पलायनाचा प्रयत्न

जळगाव -न्यायालयीन तारखेला हजेरी लावल्यानंतर कारागृहात परतत असताना एका कैद्याने गार्ड ड्युटीवरील पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कैद्याशी झालेल्या झटापटीत 1 पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत काही मिनिटातच कैद्याला पकडले. गुरुवारी रात्री जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हा प्रकार घडला असून राकेश वसंत चव्हाण (33, रा. अमळनेर) असे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याचे नाव आहे.

कैद्याच्या पळून जाण्याच्या प्रयत्नातून झालेल्या झटापटीत जखमी झालेले पोलीस कर्मचारी

राकेशवर अमळनेर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या हजेरीकरता त्याला गुरुवारी अमळनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालयातील पोलीस कर्मचारी प्रकाश कोकणे, सुभाष राठोड आणि संजय गोसावी यांनी त्याला सकाळी 10 वाजता कारागृहातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. कामकाज आटोपल्यानंतर रात्री पावणे ८ च्या सुमारास ते चव्हाणला घेऊन जळगावात परतले. कारागृहाच्या मुख्य गेटजवळ आल्यावर त्याला आत घेण्याची प्रक्रिया सुरू होती. तेव्हा त्याने गोंधळ घातला आणि नंतर पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत प्रकाश कोकणे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा - थकबाकी न भरणाऱ्या १९ व्यापाऱ्यांचे गाळे सील; जळगाव महापालिकेची कारवाई

कैदी मद्यधुंद अवस्थेत -

दरम्यान, कैदी राकेश हा कारागृहात परतला तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय त्याला आत घेण्यास कारागृह प्रशासनाने नकार दिला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिसांच्या तावडीत असताना त्याने मद्य प्राशन कसे केले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, या घटनेमुळे कारागृहातील अनागोंदी समोर आली आहे.

हेही वाचा -बालसंगोपन रजा मंजुरीसाठी दीड हजारांची लाच घेणारा वरिष्ठ सहाय्यक जाळ्यात

Last Updated : Nov 22, 2019, 11:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details