जळगाव -चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्यांशी मोठ्या हिंमतीने दोन हात करत आपल्या आईचा जीव वाचवणाऱ्या १२ वर्षीय प्रिन्स उर्फ प्रणित नितीन पाटील (रा. चोपडा, जि. जळगाव) या बालकाला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य बाल आयोग कार्यालयातून पाटील कुटुंबीयांना ही माहिती देण्यात आली आहे. पुढील महिन्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रणित पाटील हा पंकज ग्लोबल शाळेचा विद्यार्थी आहे.
काय घडली होती घटना?
प्रणितचे वडील नितीन रामभाऊ पाटील हे अभियंता व संस्थाचालक आहेत. तर आई वैशाली गॅस एजन्सीचा कारभार पाहतात. पाटील कुटुंब चोपडा येथील ओम साई अपार्टमेंटमध्ये राहतात. गेल्या वर्षी नितीन पाटील हे घरी नसताना दुपारच्या सुमारास एक अनोळखी महिला आणि एका पुरुषाने लूटमार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात प्रवेश केला. मिरचीचा स्प्रे प्रणितची आई वैशाली हिच्या तोंडावर मारला. वैशाली पाटील यांनी चोराची कॉलर पकडून विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्याने त्यांना मारहाण करत ढकलून दिले. याच वेळी अवघ्या १२ वर्षांच्या प्रणितने चोरट्याचा पाय घट्ट पकडून ठेवला. त्यामुळे त्याला पळता येत नव्हते. बराच वेळ प्रणितने त्याला घट्ट पकडून ठेवले. त्या दरम्यान, घरातील काम करणाऱ्या लताबाईने गॅलरीत जाऊन आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रणितने धाडस केल्याने वैशाली पाटील यांचे प्राण वाचले होते आणि घरात चोरीची घटना टळली होती.
प्रणितच्या धाडसाचे झाले होते कौतुक-