महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; मतदान साहित्य केंद्रांवर रवाना - VVPAT

मतदानाच्या दिवशी मंगळवारी सकाळी ६ वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यात येणार असून ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.

मतदान प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

By

Published : Apr 22, 2019, 2:57 PM IST

जळगाव -लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यासाठी मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर मतदारसंघात ३ हजार ६१७ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर २६ हजार १३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून आज त्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट तसेच स्टेशनरी साहित्य घेऊन सर्व अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात १४ तर रावेर लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात एकूण ३४ लाख ३१ हजार ४८५ मतदार आहेत. जिल्ह्यात ७ हजार ९९२ सर्व्हिस मतदार आहेत. निवडणूक कामासाठी नेमणूक असलेल्या १५ हजार २८७ मतदारांना टपाली मतपत्रिका तर ईटीपीबीएस प्रणालीद्वारे ७ हजार ६१९ मतदारांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३६२ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.

मॉकपोलनंतर सुरू होईल मतदान प्रक्रिया-

मतदानाच्या दिवशी मंगळवारी सकाळी ६ वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यात येणार असून ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. गर्दीच्या मतदान केंद्रांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details