जळगाव - शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी प्रांजल विलास सोनवणे हिने ९६ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, प्रांजलने कोणतेही खासगी क्लासेस न लावता स्वयं अध्ययन करत हे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात प्रांजलने घवघवीत यश मिळवल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
प्रांजलने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. यापूर्वी सातवीत असताना तिने अॅबॅकस परीक्षेतही जिल्हा पातळीवर यश मिळवले होते. त्यानंतर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतही तिने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. अकरावीत असताना देखील ती वाणिज्य शाखेतून मुळजी जेठा महाविद्यालयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. आता बारावीच्या परीक्षेतही प्रांजलने ९६ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना सर्वात अवघड वाटणाऱ्या अकाउंटस विषयात तिने १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. त्याचप्रमाणे संस्कृत विषयातही तिने १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.
स्वयं अध्ययनावर दिला भर-